आप पक्षातून खान यांना पायउतार विश्वास राजस्थान प्रभारी

दिल्ली महापालिका निवडणुकीत दारुण झालेल्या  पराभवानंतर आम आदमी पक्षा (आप)मध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. यामध्ये  ज्यांनी वाद निर्माण केला ते आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना पार्टीतून निलंबित करण्यात आले आहे. 

आमदार अमानतुल्लाह खान यांनी कुमार विश्वास यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे एजंट असल्याचा आरोप केला होता.पक्ष तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप विश्वास यांच्यावर  केला होता. मात्र त्यानंतर कुमार विश्वास  हे अमानतुल्लाह खान यांची पक्षातून हकालपट्टी करावी या मतावर ठाम होते तसेच झाले असून राजस्थान येथील प्रभारी म्हणून विश्वास काम पाहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा