मिळालेल्या माहितीनुसार वडील यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांच्या मुलीचा मृतदेह बेडवर पडला होता. हे वडील-मुलगी गेल्या दोन वर्षांपासून या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मृत्यूचे नेमके कारण अजून कळले नसले तरी, प्राथमिक तपासात आर्थिक अडचणी असल्याचे दिसून येते. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.