मिळालेल्या माहितीनुसार पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या गेस्ट हाऊसची बनावट वेबसाइट उघडकीस आली आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या अतिथीगृहाच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील दोन जणांना अटक केली आहे. जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (एसजेटीए) मुख्य प्रशासकांनी मंदिराच्या अतिथीगृहाची बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या अतिथीगृहाच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील दोन जणांना अटक केली आहे.