मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील एका विहिरीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. खांडवा जिल्ह्यातील एका विहिरीत संशयास्पद विषारी वायूमुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, गणगौर मातेचे विसर्जन होणार होते. पारंपारिकपणे गावाच्या मध्यभागी असलेल्या या विहिरीत विसर्जन केले जात असे. विहीर स्वच्छ करण्यासाठी तीन माणसे उतरली होती; जेव्हा ते बुडू लागले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी पाच जण आत गेले. दुर्दैवाने, ते सर्व आत अडकली. व त्यांच्या मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी खांडवा येथील अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.