ट्रक आणि एसयूव्हीच्या भीषण धडकेत ७ जणांचा मृत्यू

सोमवार, 10 मार्च 2025 (11:53 IST)
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका ट्रक आणि एसयूव्हीची टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जण जखमी झाले आहे.
ALSO READ: काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला
मिळालेल्या माहितीनुसार सिधी जिल्ह्यात ट्रक आणि एसयूव्ही यांच्यात झालेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे. सोमवारी पहाटे जिल्ह्यात एका ट्रक आणि एसयूव्ही मध्ये टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जण जखमी झाले आहे.  
ALSO READ: बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी
पोलिस उपअधीक्षक म्हणाल्या की, एका कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणारी एसयूव्ही मैहरकडे जात होती तर ट्रक सिधीहून बहरीकडे जात होता. दरम्यान, उपणी पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली."या अपघातात एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले. नऊ जखमींना पुढील उपचारांसाठी शेजारच्या रेवा जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे तर इतरांवर सिधी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे." ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती