खुंटी आणि जमशेदपूर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Webdunia
शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (11:47 IST)
खुंटी आणि जमशेदपूरच्या अनेक भागात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. चक्रधरपूर, खरसावन हे भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची तीव्रता 4.3 होती. 

तसेच या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून खुंटी येथील भूकंपाची तीव्रता 3.6 होती, तर जमशेदपूरमध्ये भूकंपाची तीव्रता 4.3 मोजली गेली.  


Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

पुढील लेख