देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये मोठी घबराट पसरली. भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:०४:५० वाजता आलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी होती.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे २८.६३ उत्तर अक्षांश आणि ७६.६८ पूर्व रेखांशावर १० किमी खोलीवर होते. दिल्ली व्यतिरिक्त, नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणातील इतर अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.