जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल आणि लडाखमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुपारी 3.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.
लडाखमध्ये दुपारी 4:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी मोजण्यात आली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी 4.01 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 मोजली गेली, त्यानंतर 4.18 वाजता किश्तवाडला आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.6 इतकी होती.