या महिन्यात दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री भूकंप झाला, ज्यामध्ये सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ आहे, ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी होती.
सोमवारी दुपारी 4.16 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेकडे जाताना दिसले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.