बिहारच्या पाटणा आणि पश्चिम चंपारणमध्ये भूकंपाचा धक्का
बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (16:42 IST)
बिहारच्या काही भागात बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी पाटणाशिवाय पश्चिम चंपारणमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आतापर्यंत कुठूनही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ काठमांडूपासून 66 किमी पूर्वेला होता.दुपारी 2:52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी होती.