बंगाल वॉरियर्सने पीकेएल 2022 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. ते सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, पाटणा पायरेट्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आणि 4 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
सामना - बंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स, 21 वा सामना
तारीख - 15 ऑक्टोबर 2022, रात्री 9:30 IST
स्थळ - कांतीरवा स्टेडियम, बंगळुरू
बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग (कर्णधार), वैभव गर्जे, दीपक निवास हुडा, श्रीकांत जाधव, गिरीश मारुती एर्नाक, शुभम शिंदे आणि डी बालाजी.
पाटणा पायरेट्स
नीरज कुमार (कर्णधार), सी साजिन, सचिन तन्वर, सुकेश हेगडे, रोहित गुलिया, सुनील आणि मोहम्मदरेझा शाडलू.