उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका : योगी आदित्यनाथ

रविवार, 17 मे 2020 (08:30 IST)
घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. राज्याच्या सीमा क्षेत्रात अनेक प्रवासी कामगार किंवा मजूर हे येत आहे. ते पायी, बाईक, ट्रक आणि इतर अवैध वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र या सर्वांना यापुढे प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. जो कोणी अवैध वाहनाने राज्याच्या सीमेवर येतील, त्यांच्या गाड्या तात्काळ जप्त केल्या जातील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 
राज्यातील मजुरांनी माझे आवाहन आहे की, त्यांनी स्वत: सह आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून असुरक्षित वाहनाने प्रवास करु नका. तसेच संबंधित राज्यातील सरकारने मजुरांच्या सुरक्षित जाण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती