अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींच्या मुलीचं लग्न दगडी चाळीत पार पडलं

शनिवार, 9 मे 2020 (12:37 IST)
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी योगिताचं लग्न मराठी अभिनेता अक्षय वाघमारेसोबत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलं. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे दगडी चाळीमध्येच हा विवाह पार पडला. 
 
दगडी चाळीच्या परिसरातील श्री शंभूनारायण या शंकराच्या मंदिरात या विवाहाचे विधी पार पडले. लग्नाला कुटुंबातील मोजकी मंडळी उपस्थित असल्याची माहिती अरुण गवळी यांची मोठी मुलगी गीता गवळी यांनी मिरर ऑनलाइनला दिली.
 
गीता गवळी आग्रीपाडयामधून नगरसेविका आहेत. त्यांनी सांगितले की यासाठी कुणलाही मंडप उभारण्यात आल नव्हता किंवा रोषणाई केली नव्हती तसेच कुठलेही वाद्य देखील ठेवण्यात आले नव्हते. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर कदाचित लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात येऊ शकतो असे गीता गवळी यांनी सांगितले. 
 
हे लग्न २९ मार्चला होणार होते. पण करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने हे लग्न पुढे ढकलावे लागले. योगिताची मुंबईमध्ये स्वत:ची एनजीओ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती