धनबाद जवान संदीप सिंग तोफगोळ्याचा स्फोटात शहीद

सोमवार, 20 डिसेंबर 2021 (09:12 IST)
जैसलमेरमधील किशनगढ फील्ड फायरिंग रेंजमध्ये सरावादरम्यान तुंडी जवान संदीप कुमार सिंह शहीद झाले आहेत. बीएसएफच्या पंजाब फ्रंटियरमध्ये तैनात असलेल्या संदीप सिंगचा सराव दरम्यान तोफगोळ्यांचा स्फोट झाल्यामुळे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले.  संपूर्ण धनबादमध्ये शोककळा पसरली आहे.
जैसलमेरमध्ये, किशनगड फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोर्टारने गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना धनबादचे जवान संदीप सिंग शहीद झाले. सराव सुरू असताना मोर्टारच्या गोळ्यांचा स्फोट झाल्याने जवान संदीप सिंग आणि शेजारी उभे असलेले इतर जवान गंभीर जखमी झाले. सर्वांना तात्काळ रामगड रुग्णालयात आणण्यात आले, तेथे जवान संदीप सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जवान संदीपच्या शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मूळ गावी चरक कला येथे शोककळा पसरली आहे. बीएसएफचे डेप्युटी कमांडंट गुरप्रीत सिंग यांनी कुटुंबीयांना याची माहिती देताच आई आणि पत्नीची प्रकृती अधिकच बिघडली आहे. आईची प्रकृती वाईट असताना पत्नीला हा धक्का सहन होत नाही. पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडणाऱ्या पत्नीची अवस्था पाहून घरातील इतर सदस्य काळजीत पडले. स्थानिक लोक कुटुंबाचे सांत्वन करत आहेत
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती