धक्कादायक बातमी ! 12 तासात भाजपच्या दोन नेत्यांची हत्या ,कलम 144 लागू

रविवार, 19 डिसेंबर 2021 (12:57 IST)
केरळमध्ये राजकीय हत्येचे चक्र सुरूच आहेत . केरळच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या दोन नेत्यांची कथितरित्या हत्या करण्यात आली, ही घटना अलाप्पुझा येथे घडली आहे. या , हत्याप्रकरणी  पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये काही जणांचा थेट सहभाग असल्याचा संशय आहे. एकामागून एक राजकीय हत्याकांडानंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी जिल्ह्यात दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आली आहे.  वरिष्ठ पोलिस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अवघ्या 12 तासांत दोन राजकीय खुनाच्या घटनांनी राज्य आणि  जिल्हा हादरला आहे. 
SDPI चे राज्य सचिव, 38 वर्षीय शान केएस यांची शनिवारी रात्री अज्ञात टोळक्याने चाकू ने वार करून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसडीपीआय नेत्यावर मान्नाचेरी येथे स्कूटरवरून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, कारमधील हल्लेखोरांनी आधी त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि खाली पडल्यानंतर त्याच्यावर वारंवार वार केले. एसडीपीआय नेत्याला अनेक फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाली आणि नंतर एर्नाकुलममधील एका खाजगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
12 तासांपेक्षा कमी कालावधीत, रविवारी भाजप ओबीसी आघाडीचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भाजप नेते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने वार केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अलाप्पुझा येथील दोन राजकीय हत्यांचा निषेध केला आणि म्हणाले, "सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती