करुणानिधीच्या अंत्यदर्शनासाठी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (17:24 IST)
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.
 
करुणानिधींच्या दर्शनस्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत.  राज्य सरकारनं द्रमुकनं दाखल केलेल्या याचिकेला विरोध करताना प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. करुणानिधी हे माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकत नाहीत, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. मात्र हा मुद्दा न्यायालयानं फेटाळून लावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती