बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी

बुधवार, 10 एप्रिल 2024 (16:15 IST)
फेसबुकच्या माध्यमातून पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्या धमकी मध्ये असे लिहले आहे की, तुमच शीर धडावेगळं करू, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या धमकीमुळे संतापले आहे वे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील सनातन धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो सोशल मीडियावर असभ्य रीतीने व्हायरल करण्यात आला. तसेच त्यामध्ये त्यांच्या शिरच्छेदाची ऑडियो देखील आहे. 
 
या व्हिडियोमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून, संतापाचे वातावरण समाजातील संघटनांमध्ये निर्माण झाले आहे. तसेच आमल पोलीस स्टेशनमध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली गेली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. व कायदेशीर कार्यवाही केली जात आहे असे देखील सांगितले गेले आहे. तसेच या आधीदेखील धीरेंद्र शास्त्री यांना धमक्या आल्या होत्या. याकरिता त्यांच्या सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती