छत्तीसगडच्या दुर्गमध्ये बस दरीत कोसळून भीषण रस्ता अपघात,12 ठार

बुधवार, 10 एप्रिल 2024 (12:19 IST)
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात मोठा रास्ता अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. 30 हुन अधिक जखमी झाले आहे. बस मध्ये सुमारे 40 प्रवाशी प्रवास करत होते. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास डिस्टलरी कंपनी मध्ये काम करणारे शिफ्ट संपल्यावर घरी जात असताना हा अपघात झाला. 

बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगतिले जात आहे. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचाव कार्य सुरु केले. जखमींना रायपूर, भिलाईच्या रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बस दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. 

घटनेची माहिती मिळतातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दुर्ग, छत्तीसगड, येथे बस अपघात दुःखद आहे, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहे त्यांना माझ्या संवेदना, जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरे व्हावे अशी कामना. 

या अपघातावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केले आहे. त्यांनी X वर लिहिले आहे कुम्हारी,दुर्ग जवळ एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळाली. दिवंगत आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल परिवाराला शक्ती देवो ईश्वर चरणी प्रार्थना. अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.राज्य सरकार कडून अपघातातील मृत कुटुंबातील एका सदस्याला नौकरी आणि 10 लाख रुपये देत आहे. उपचाराचा खर्च कंपनी आणि सरकार उचलणार आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी जाहीर करण्यात आली आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती