देशात कोरोना वाढला: आज राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत, केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया घेणार बैठक

शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:24 IST)
देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज, शुक्रवारी (7 एप्रिल) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.
दरम्यान गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात 2300 हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बैठक बोलावली आहे.
 
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज, शुक्रवारी (7 एप्रिल) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती