गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना 2017 च्या एका प्रकरणात 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र फाडल्याचा आरोप पटेल यांच्यावर आहे.