आरएसएस प्रमुख मोहन भागवत उत्तर प्रदेशातील होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मथुरा दौऱ्यावर आहे. योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतच संघ प्रमुखांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक सुमारे 1 तास चालली. तसेच बैठकीनंतर योगी आदित्यनाथ आग्राला रवाना झाले. आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.