छोटा शकील याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणच्या पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे मुंबई बॉम्बस्फोटांनंतर परांगदा झाले व पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. यात छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एकुलता एक असलेला मुलगा मोबाशीर शेख (व18) सध्या शिकत आहे. मात्र मोबाशीरने डॉन म्हणून कुख्यात असलेल्या वडिलांचा रक्तरंजित प्रवास खंडित करीत अध्यात्माची कास धरली असून मौलवी होणं स्वीकारलं आहे.