छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल होणार

सोमवार, 17 डिसेंबर 2018 (13:04 IST)
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. छत्तीसगडचे आगामी मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले.
 
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये बघेल यांच्यासह टी.एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास महंत या तिघांचा समावेश होता. मात्र या तिघांनाही मागे टाकण्यात बघेल यशस्वी ठरले आहेत. बघेल हे छत्तीसगड काँग्रेस प्रदेश कमिटिचे प्रमुख असून शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आक्रमक नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपासून ते नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणनीती बघेल यांनीच तयार केली होती. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच काँग्रेसला छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी 68 जागा जिंकता आल्यानेच काँग्रेस हायकमांडने बघेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी झालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बघेल यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आले आहे.
 
मध्यप्रदेशातील (आताच्या छत्तीसगड) दुर्ग येथे 23 ऑगस्ट 1961 रोजी जन्मलेल्या बघेल यांनी 80 च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणास प्रारंभ केला. दुर्ग जिल्ह्यातच ते यूथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1990 ते 94 पर्यंत जिल्हा युवक कमिटी, दुर्ग (ग्रामीण) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम  पाहिले. 1993 ते 2001 पर्यंत ध्यप्रदेश हौसिंग बोर्डाचे ते संचालक होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती