केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट - cbse.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षेचा रोल नंबर आवश्यक असेल.
यावर्षी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 93.66% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. या वर्षी, 95% मुली दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत तर 93.66% मुले यशस्वी झाली आहेत.
दहावीच्या परीक्षेत 26,675 शाळांनी भाग घेतला आहे. दहावीची सीबीएसई परीक्षा 7,837 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. तर, गेल्या वर्षी 25,724 शाळांनी सहभाग घेतला होता आणि 7,603परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 23,85,079 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 23,71,939 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 22,21,636 आहे. त्याच वेळी, यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.66आहे.