रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा

मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:13 IST)

प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टाडा न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे. या हत्येप्रकरणी यापूर्वीच विशेष न्यायालयाने, अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मोहम्मद मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पहिल्यांदा रियाज, अबू सालेम व हसन मेहेंदी यांच्यावरील खटला एकत्रितपणेच सुरू होता. परंतु सिद्दिकीने खरं उघड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर तसा जबाबही नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच त्याने जबाब मागे घेतल्यानं तो फितूर असल्याचे सरकारी वकिलांनी जाहीर केले. या कारणास्तव रियाजवर स्वतंत्रपणे खटला चालविण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती