मोदी सरकार पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अति शहा यांनी दिले. अहमदाबादमधील शिलाज येथील ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
शहा म्हणाले, भाजप सरकार देशाच ग्रामीण तसेच शहरी भागात गृहनिर्माण प्रकल्प राबवित आहे. पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले जाईल, याचा मला विश्वास आहे. आतापर्यंत मोदी सरकारने 10 कोटींहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली आहेत.