कोविशील्ड आणि कोवॅक्सीन दोन्ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहेत- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन.
शनिवार, 27 मार्च 2021 (21:16 IST)
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लस या दोन्ही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रतिरोधक आहेत .देशात या लसी वापरल्या जात असणाऱ्या या लसींना घेऊन अद्याप कोणतीही चिंता नाही.
त्यांनी 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव्ह' मध्ये कोविशील्ड बाबत वाढत्या चिंतेला उत्तर देताना टिप्पणी करण्यात आली होती . या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत आहे अश्या बातम्या आल्या आहेत.
ते म्हणाले की जेथे अशा घटनांची नोंद झाली आहे. तेथे अशा देशांची सरकार प्रकरणांची तपासणी करत आहे.
ते म्हणाले की भारतात लसीकरणानंतर होणाऱ्या प्रतिकूल प्रभावाच्या (एईएफआय) सर्व घटनांचे नियोजन सुव्यवस्थित आणि मजबूत मॉनिटरिंग प्रणाली द्वारे केले जाते.
ते म्हणाले की लसीकरणाच्या नंतर आतापर्यंत भारतात कोणतीही प्रतिकूल घटना घडल्याची नोंद झालेली नाही.
ते म्हणाले की आपल्या देशात वापरल्या जाणार्या दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रतिरोधक आहेत. सध्या भारतात लसी वापरल्या जात असलेल्या सुरक्षितते बाबत कोणतीही चिंता नाही.