आज सकाळी गुडगावच्या सेक्टर -29 भागात अज्ञाताने एका क्लबवर बॉम्बने हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या क्लब वर दोन बॉम्ब टाकले गेले. एक स्कूटर आणि क्लबच्या बोर्डाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना बॉम्ब असलेली एक टाकलेली बॅगही सापडली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त, डीसीपी आणि बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बॉम्ब निकामी करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. सेक्टर -२९ मध्ये एका तरुणाने दोन बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली असून एक बॉम्ब स्फोट एका कॅफेच्या बाहेर उभा असलेल्या स्कुटर वर झाला तर दुसरा बॉम्ब क्लब वर फेकला गेला. एका बॉम्ब ने स्कुटरचे नुकसान झाले तर दुसऱ्या बॉम्ब ने क्लब बोर्डाचे नुकसान झाले.