नोटबंदीच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने एकापाठोपाठ एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय यशस्वी झाला असल्याचे दाखवले आहे.
भाजपकडून जो पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला, त्यात एक महिला नोटाबंदीच्या निर्णयावर आपला रोष व्यक्त करत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत शेल कंपन्यांचा एक मालक म्हणतोय की, नोटाबंदीमुळे त्याला उद्ध्वस्त केलं. तिसऱ्या व्हिडीओतून नोटाबंदीमुळे दहशतवादाचं कंबरड मोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
या व्हिडीओद्वारे भाजपचा दावा आहे की, नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दगडफेकीच्या प्रमाणात 75 टक्क्यांनी घट झाली. तर नक्षल्यांच्या हल्ल्यातही 20 टक्क्यांची घट झाली. याशिवाय या निर्णयामुळे भ्रष्ट नेते मंडळी आणि करबुडव्यांचं कंबरडं मोडलं आहे असे दाखवले आहे.