सदोष इव्हीएमच्या वापराविरोधात गुजरातमध्ये याचिका

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (09:11 IST)
गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान सदोष इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येऊ नये यासाठी गुजरात कॉंग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही सदोष मतदान यंत्रे सीलबंद करण्यात यावीत, आणि मतदानादरम्यान या मशिनचा वापर करण्यात येऊ नये, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात्‌ आली आहे. या याचिकेच्या आधारे गुजरात उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्राच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. कॉंग्रेसच्या याचिकेवर 13 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यात यावे, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने केली आहे.
 
गुजरातमधील एकूण 70 हजार 182 “व्हीव्हीपॅट’ पैकी 7 टक्के “व्हीव्हीपॅट’ आणि “इव्हीएम’ सदोष असल्याचे पहिल्या टप्प्याच्या चाचणीच्यावेळी निदर्शनास आले होते. ही मशिन सीलबंद करण्यात यावीत आणि कोणत्याही मतदान केंद्रावर वापरण्यात येऊ नयेत. तसेच सदोष मतदान यंत्रांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतःच एक तज्ञांची कमिटी स्थापन करावी, अशीही मागणी कॉंग्रेसने आपल्या याचिकेत केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती