प्रगतीशील शहरांची यादी प्रसिद्ध, बंगळुरु प्रथम

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रगतीशील शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रगतीच्या विविध भागांची आणि शहरात असलेल्या नागरी सुविधा पाहून  प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील पहिले शहर ठरले ते आहे बंगळुरु तर त्या सोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
 
प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला स्थान देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा