सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु

शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:52 IST)
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांमध्ये योग्य समन्वय असून सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे अशी माहितीमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.    
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बोलून आधी तीन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जसजसे पाणी वाढत गेले तसा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. केंद्राकडूनही मदत मागण्यात आली आहे. सकाळीच नेव्हीच्या १३ पथकाना पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीनुरूप प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती