विधिमंडळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याआधीच त्यांच्या ट्वीटर अकांऊटवरून अर्थसंकल्प जाहिरातीसह प्रसिद्ध होत होता. सदर बाब पुराव्यासह विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिली. आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करताना कधीच अर्थसंकल्पातील तरतूदी फुटल्या नाहीत. मग, या सरकारच्या काळात अर्थसंकल्प मांडण्याआधीच सोशल मीडियामध्ये जाहिरातीसह कसा येतो? असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचा अवमान केल्याबद्दल माफी मागण्याऐवजी सदर कामकाज पुढे नेल्याने विरोधकांनी सभात्याग केला, असेही पवार म्हणाले.