आसाराम बापू प्रकरणी दिरंगाई का ?

आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले आहे. आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप असून चार वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत. मात्र अद्यापही पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत खटल्यात इतकी दिरंगाई का असा सवाल विचारला आहे. 'खटल्यात इतका उशीर का ? आतापर्यंत पीडित महिलेची साक्ष का घेण्यात आली नाही ?' असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारले आहेत. न्यायालयाने प्रगती अहवाल सादर करण्याच आदेशही दिला आहे. 
 
76 वर्षीय आसाराम बापू यांच्यावर आश्रमात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती