ताजमहाल मंदिर नाही...आता मान्य........

सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (09:03 IST)

ताजमहाल हे मंदिर होते असे अनेकांचा कयास होता. मात्र तो आता फोल ठरला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) पहिल्यांदाच मान्य केलं की ताजमहाल मंदिर नाही, तर ते समाधीस्थळ आहे हे आहे.   कोर्टातीत  प्रतिज्ञापत्रात विभागाने तसा उल्लेख केला आहे. एएसआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ताजमहालला संरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने १९२० च्या एका अधिसूचनेच्या आधारावर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. तेव्हा आता हे मान्य करण्यात आले आहे. 

 ताजमहालाच्या जागी मंदिर असण्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असं लोकसभेत स्पष्ट सांगितले आहे. तर यामध्ये  तसंच 2015 साली आग्रा जिल्हा कोर्टात 6 वकिलांनी एक याचिका दाखल केली होती. ताजमहाल  पूर्वी शंकराचे मंदिर होते, त्याचमुळे या परिसरात आरती करण्याची परवानगी द्यावी असे सांगत मागणी केली होती.  ताजमहालात काही खोल्या बंद आहेत त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी सुद्धा केली आहे.च याचिकेवर भारतीय पुरातत्त्व खात्याचे म्हणणे काय आहे हे कोर्टाने जाणून घेतल आहे. त्यामुळे आता कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य करणे पडणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती