भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, भारतीय लढाऊ विमानांनी रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर तसेच पसरूर आणि सियालकोट हवाई तळांच्या रडार साइट्सवर हवाई शस्त्रांचा वापर करून अचूक प्रतिहल्ला केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानकडून भारताविरुद्ध करण्यात येत असलेली कारवाई निराशाजनक असेल. परराष्ट्र सचिव म्हणाले, 'पाकिस्तानच्या कृती चिथावणीखोर आणि तणाव वाढवणाऱ्या होत्या. परंतु, भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाईत संयम दाखवला. भारताने बचाव केला आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर दिले.