Aligarh: माझं मूड गेलंय... असं म्हणत ANM ने लसीकरण न करता 29 भरलेल्या सिरिंज कचर्‍यामध्ये टाकल्या

सोमवार, 31 मे 2021 (14:25 IST)
उत्तर प्रदेशमधील अलिगड जिल्ह्यातील जमालपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस भरलेल्या सिरिंज कचर्‍यामध्ये टाकण्याचा आरोपखाली एएनएम निहा खान आणि डॉक्‍‍‍टर जेहरा यांच्याविरुद्ध अहवाल दाखल केला आहे. तसेच आरोग्य विभागाने त्यांची सेवा निरस्त केली आहे.
 
अलीगढच्या जमालपुरमध्ये अर्बन पीएचसी येथे वॅक्सीन सेंटर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित प्रकरणं समोर आले आहेत.अशात दररोज 250 लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले. तेथे वॅक्सीन एंड कोल्ड चेन मॅनेजर रवेंद्र शर्मा तपासणीसाठी दाखल झाले असताना त्यांना लस भरलेल्या सिरिंज कचर्‍यामध्ये पडलेल्या आढळल्या. तातडीने ही माहिती सीएमओला देण्यात आली.येथून चौकशीचे आदेश देण्यात आले.
 
तपासादरम्यान, केंद्रात तैनात असलेल्या सर्व लोकांची निवेदने घेण्यात आली आहेत. बुधवारी डीएमने एएनएमला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचबरोबर ही सेवा बंद करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आल्या. चौकशी अहवालात जी लोकं निष्काळजीपणाने वागत असल्याचे आढळेल त्यांच्याविरुद्ध गुन्हादेखील नोंदविला जावा, असा आदेश डीएमंनी दिला आहे. तपासात आरोप खरे आढळल्यावर एएनएम निहा खान आणि डॉ. झेहरा यांची सेवा संपुष्टात आणली गेली आहे. त्याचबरोबर अहवालही दाखल केला आहे.
 
काय आहे प्रकरणं
सोमवारी (24 मे) अलिगडमधील जमालपूर अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर (यूपीएचसी) येथे तपासणी दरम्यान लस भरलेल्या 29 सिरिंज कचर्‍यामध्ये सापडल्या तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर हे प्रकरण तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भानू प्रताप कल्याणी यांना कळविण्यात आले, त्यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले. तपासादरम्यान, केंद्रात पोस्ट केलेल्या सर्व लोकांची विधाने नोंदविण्यात आली.
 
आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या इतर कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की एएनएम निहा खान लसीकरण करण्याऐवजी लसीने भरलेली सिरिंज तोडून डस्टबिनमध्ये टाकत होती. यानंतर स्टाफ निहा यांच्याशी बोलला असता मूड खराब आहे म्हणून असं करत असल्याचं सांगितले गेलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती