दागिने घेऊन फरार नवरी, लग्नासाठी नवरदेवाकडून घेतले एक लाख

सोमवार, 12 एप्रिल 2021 (13:20 IST)
एका धक्कादायक घटनेत नवरीमुलगी चार फेरे घेऊन फरार झाली. दागिने आणि रक्कम घेऊन लंपास झालेली नवरी खूप वेळ आली नाही तेव्हा नवरदेवाला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्याने थेट पोलिस स्टेशन गाठलं.
 
मुजफ्फरनगरच्या मोहम्मदपूर गूमी येथील रहिवासी नवरदेवाला स्थळ आलं तेव्हा मुलीच्या कटुंबाला लग्नासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आलं. नवरदेवाने मुलीचा फोटो बघून लग्नासाठी होकार‍ दिला. परतापूरच्या भूडबराल गावात मंदिरात लग्नासाठी नवरदेव रक्कम आणि दागिने घेऊन आला. मुलीकडेचे तीन आणि मुलाकडेच चार लोक लग्नाला उपस्थित असताना चार फेरे पूर्ण झाल्यावर रक्कम मुलीच्या कुटुंबातील सदस्याकडे सोपविण्यात आली. तेव्हा मुलीने वॉशरुमला जायचं म्हणून तेथून जी निघाली तर परतलीच नाही. तिच्यासोबत असणारे देखील शोधण्याच्या बहाण्याने निघून गेले. लग्न लावणारा पंडित देखील निघून गेला तेव्हा आपली फसवणूक झाल्याची जाणीव नवरदेवाला झाली.
 
नवरदेवाने नंतर परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती