तिरुअनंतपुरमहून मस्कतला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच धूर निघू लागला. या अनपेक्षित परिस्थितीमुळे विमानाला तिरुअनंतपुरम विमानतळावर तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात उपस्थित 148 प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचू शकले आणि सर्वजण सुरक्षित आहेत.
त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या निवेदनात ते म्हणाले, आम्ही आमच्या ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्यामुळे गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
विमानातून धूर का निघू लागला हे सध्या स्पष्ट झालेले नाही. यासाठी सविस्तर तांत्रिक तपास केला जाईल, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.