अमित शाह यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज आपल्या सैनिकांनी 'नक्षलमुक्त भारत अभियान' च्या दिशेने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर येथे आमच्या सुरक्षा दलांच्या दोन वेगवेगळ्या कारवाईत २२ नक्षलवादी ठार झाले. ते म्हणाले, "मोदी सरकार नक्षलवाद्यांवर निर्दयी दृष्टिकोन ठेवून पुढे जात आहे आणि आत्मसमर्पणापासून समावेशापर्यंतच्या सर्व सुविधा असूनही आत्मसमर्पण न करणाऱ्या नक्षलवाद्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारत आहे." पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार आहे. असे देखील ते म्हणाले.