मिळालेल्या माहितीनुसार सरकारी रुग्णालयामध्ये पोहोचल्यावर इमर्जन्सीमध्ये तैनात असलेल्या डॉक्टरांनी गरोदर महिलेला स्ट्रेचर देण्याऐवजी तिला पायीच मदर अँड चाइल्ड रुग्णालयामध्ये पाठवण्याची सूचना केली. तसेच यावेळी महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने ती वाटेत खाली पडली. गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी स्टाफ नर्सची मदत घेतली आणि डॉक्टरांना त्वरित बोलावण्याची विनंती केली. माहिती मिळताच एमसीएचचे डॉक्टर आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. गर्भवती महिलेची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी विलंब न लावता रस्त्यातच प्रसूती केली. रात्री 10.45 वाजता महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला.