देशांतर्गत विमान सेवा १८ मे पासून सुरू केली जात आहे. मात्र सामान्य प्रवाशांसाठी ही विमान सेवा दिली जाणार नाही. एअर इंडियाकडून या संदर्भातील निवेदनजारी करण्यात आलं आहे. परदेशातील लोक येत आहेत. केवळ त्यांनाच ही विमान सेवा असणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यानुसार एअर इंडियाचं तिकीट बुकिंग गुरुवार सायंकाळपासून सुरू झालं आहे.
एअर इंडियाकडून भारतातून अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, फ्रॅंकफर्ट, पॅरिस आणि सिंगापूर आदींच्या उड्डाणासाठी गुरुवारपासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे, त्यानुसार संबंधित देशातील लोकांनाच या विमानातून प्रवास करता येणार आहे. तसंच काही उड्डाणात त्या देशात काही वेळासाठी वैध व्हिसा असणाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वंदे भारत मिशनचा हा दुसरा टप्पा असणारा आहे.