पाटीदार आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन, जुनागड येथे १४४ लागू

शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (15:46 IST)
हार्दिक पटेल ने पुन्हा एकदा पाटीदार आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले असून पोलिसांनी खबरदारी म्हणून जुनागड येथे कलाम १४४ लागू केले आहे.आपल्या घरामध्येच हार्दिकने अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केले. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे असा आरोप त्याने गुजरात सरकारवर केला आहे.जुनागडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले आहे.
 
सार्वजनिक जागेवर 4 पेक्षा अधिक लोकांनी जमण्यास बंदी घातली गेली आहे. हार्दिकने मात्र सर्व कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे असे स्पष्ट केले आहे. तीन वर्ष्पुर्णी जेव्हा असे आंदोलन झाले त्यात 14 लोकांनी आपले प्राण गमावले सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलच्या घराजवळ प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याच्या घरात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती