राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे भविष्यात आरक्षण मिळाले, तरी गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे कामगार सेनेच्या वाशीतील मेळाव्यात ते बोलत होते.
सर्वच राजकीय पक्षांकडून आरक्षणाचे केवळ राजकारण केले जात आहे. एकीकडे तरुणांना पेटवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. या वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या झालेल्या आंदोलनांमध्ये राज्यातील ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.