अभिनेता दीप सिद्धूचे अपघातात निधन

मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (22:22 IST)
शेतकरी आंदोलनात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या पंजाबी गायक आणि अभिनेता दीप सिद्धू यांचे अपघातात निधन झाले. दिल्ली ते पंजाब येतांना हरियाणातील सोनिपत जवळ वेस्टर्न पेरिफरल एक्स्प्रेसवेवर हरियाणातील खरखोडाजवळ झालेल्या  अपघातात दीप सिद्धू यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर प्रजासत्ताक दिना निमित्त झालेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लालकिल्ल्यावरील हिंसाचाराचा आरोप ही करण्यात आला होता. दीप सिद्धू यांचे भाजपशी संबंध असल्याचे सामोरी आले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती