लासा ताप हा उंदरांद्वारे पसरतो
लासा तापाचा विषाणू पश्चिम आफ्रिकेत सापडला असून 1969 मध्ये पहिल्यांदा नायजेरियात लसाचा रुग्ण आढळला होता. नायजेरियातील दोन परिचारिकांच्या मृत्यूनंतर या आजाराचे निदान झाले असल्याचे कळते. लसाचा संसर्ग उंदरांपासून होतो असे सांगण्यात येत आहे. संक्रमित उंदराच्या मूत्र किंवा विष्ठ दूषित अन्न किंवा घरगुती वस्तूंच्या संपर्कात आल्यावर हा संसर्ग माणसांमध्ये पसरतो. नंतर हा आजार माणसापासून माणसात पसरू शकतो. बाधित रुग्णाच्या डोळे, नाक किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थाच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरु शकतो. शिवाय इतर संपर्क जसे की मिठी मारणे, हात मिळवणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या जवळ बसणे, या रोगाचा संसर्ग होण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत.
लासा तापाची लक्षणे साधारणतः 1 ते 3 आठवड्यांनंतर दिसूून येतात. सौम्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी जाणवतं. गंभीर लक्षणांमध्ये रक्तस्त्राव, श्वास घेण्यात अडचण, उलट्या, चेहर्यावर सूज येणे, छाती, पाठ आणि पोटदुखी हे लक्षणं दिसून येतात.