मिशन शक्ती: मोदींनी दिली ही माहिती, भारताकडून एक उपग्रह पाडण्यात यश आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करत म्हटले की भारत अंतराळातील महाशक्ती बनलं आहे. आज भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच ही उपलब्धी मिळवली होती. प्रत्येक भारतीयासाठी याहून गर्वाची गोष्ट काय असू शकते.
भारत अंतराळाची महाशक्ती बनलं. वैज्ञानिकांनी सर्व लक्ष्य हासिल केले. मी त्यांचे खूप अभिनंदन करतो.
मिशन शक्ती एक अवघड ऑपरेन होतं. वैज्ञानिकांनी यशस्वी पार पाडले.
भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले
अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे ज्याने ही शक्ती साध्य केली आहे.
आमचा उद्देश्य शांती कायम ठेवणे आहे, युद्धाची स्थिती निर्मित करणे नव्हे.
 
उल्लेखनीय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्विटरद्वारे माहिती दिली होती की मी देशवासीयांना संबोधित करणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी नेमकी काय घोषणा करणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागून होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती