लग्नानंतर तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव, गुन्हा दाखल

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (21:03 IST)
राज्यात लव्ह जिहादचा  प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल  झाला आहे.
 
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे हा प्रकार घडला आहे. एका 21 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून फुस लाऊन पळवून नेले आहे.  या तरुणीला कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, जवळा बाजार,औरंगाबाद आणि दिल्ली येथील फरीदाबाद येथे नेऊन तिची संमती नसतांना तिच्या सोबत शारिरिक संबंध  प्रस्थापित केले गेले.  मात्र, काही दिवसांतच धर्मांतरासाठी दबाव आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.
 
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून साजीद रफीकखाँ पठाण रा. जवळा पांचाळ,तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली याच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 376 (2) नुसार बलात्कार, N 506 आणि अट्रोसिटी नुसार हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
 
 लव्ह जिहादमध्ये राज्यातून बेपत्ता मुलींचा शोध घेतला जाणार असल्याची घोषणा राज्याचे महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.  
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती