मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील एका खासगी शाळेत पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. माल्या माहितीनुसार UKG मध्ये शिकणाऱ्या एका चिमुरडीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी हा पंधरा वर्षाचा असून त्याने चिमुरडीचा विनयभंग केला आहे, तसेच पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बाल निरीक्षण गृहात पाठवले आहे.
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, यूकेजीमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीच्या आईला संशय आला तेव्हा तिने मुलीला विचारले आणि तिने सांगितले की शाळेतील एक मोठा मुलगा तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करत आहे. मुलीला सोबत घेऊन तिच्या कुटुंबीयांनी प्रथम शाळा व्यवस्थापनाकडे आणि नंतर पोलिसांकडे या घटनेची तक्रार दाखल केली.