मृत्यूच्या दारातील नवऱ्याचा हात धरताच चमत्कार

शनिवार, 6 जानेवारी 2024 (12:14 IST)
नवरा बायकोचे नाते अतूट बंधनाचे असतात. या नात्यात रुसवे फुगवे होतातच तरीही दोघांमुळे संसाराची गाडी सुरळीत चालते. दोघांपैकी एक जण जरी डगमगला तरीही संसाराची गाडी रुळावरून निसटते. दिल्लीत एका बायकोने आपल्या पतीला मृत्यूच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढण्याची घटना घडली आहे. अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी पतीला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. रक्तप्रवाह ही थांबला होता.

डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आणि त्याला सीपीआर देण्यात आले. त्याला नवजीवन मिळालं आणि त्याचे बंद पडलेलं  हृदय पुन्हा सुरु झालं. आता डॉक्टरांनी सर्व चाचणी केल्यावर त्यांना धक्काच बसला. त्याचे कारण असे की रुग्णाला कोणताही आजार नव्हता तरीही त्याला एवढ्या कमी वयात हृदयविकाराचा झटका कसा काय आला. त्यांनी शुद्धीवर आलेल्या रुग्णाला विचारपूस केल्यावर रुग्णाने सांगितले की त्याला एक 4 महिन्यांची मुलगी आहे. आणि त्याला पत्नीशी बोलायचे आहे. असे सांगितले. मात्र पत्नी आणि त्याच्यात वाद सुरु असून त्यांचा लवकरच घटस्फोट होण्याचं पालकांनी सांगितले. त्यावरून डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका येण्याचं कारण समजले. हे सर्व त्याच्या पत्नी आणि मुलीशी संबंधित आहे. त्यांनी पत्नीची भेट घेतली  आणि तिने आमचं घटस्फोट होण्याचं डॉक्टरांना सांगितले.

नंतर डॉक्टरांनी तिला समजावले आणि तूच तुझ्या नवऱ्याला माझ्या कडे तपासणीला ओपीडीत आणशील असे म्हटले तिने होकार दिला आणि नवऱ्याची काळजी घेत  राहिली. व डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तपासणीला घेऊन जात होती. तो तरुण तिच्या सेवेमुळे लवकर बरा  झाला आणि त्यांच्यातील मतभेद देखील मिटले आणि ते आनंदात एकत्र मुलीचे संगोपन करत आहे. बायकोने सावीत्री बनून यमाच्या दारातून आपल्या पतीचे प्राण परत आणले. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती